शृंगारतळीच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. नजारिया साल्हे यांचे रशियात वैद्यकीय शिक्षण पूर्ण, NBEMS परीक्षेत यश

banner 468x60

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर शृंगारतळी (शृंगारी मोहल्ला) येथील नजारिया रमजान साल्हे हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. रशियामध्ये पाच वर्षांचे वैद्यकीय शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर तिने भारतातील NBEMS (नॅशनल बोर्ड ऑफ एग्झॅमिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस) ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करत MBBS पदवी प्राप्त केली आहे.

banner 728x90

तिच्या या यशामुळे संपूर्ण गुहागर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


या यशामागे तिचे वडील रमजान साल्हे यांची मेहनत, तसेच आई-वडील आणि भावाचा ठाम विश्वास मोलाचा ठरला. “माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच आज हे स्वप्न पूर्ण करू शकले,” अशी भावना डॉ. नजारिया साल्हे यांनी व्यक्त केली.
परदेशात शिक्षण घेऊन भारतात आपली गुणवत्ता सिद्ध केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

निकालाची बातमी समजताच पाटपन्हाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच आसीम साल्हे यांनी तिचे अभिनंदन करत पुढील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एका सामान्य कुटुंबातील मुलीने मिळवलेल्या या यशाचा परिसराला विशेष अभिमान वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *