चिपळूण : निलीमा चव्हाण मृत्यूप्रकरणात 18 दिवसात पहिली अटक

banner 468x60

गेल्या 18 दिवसापासून नीलिमाच्या मृत्यूचं गणित सुटलं नाहीय. मात्र गेल्या 18 दिवसाच्या तपासात एका व्यक्तीला अटक करण्यास पोलिसांना यश आलं आहे. निलीमा चव्हाण मृत्यूप्रकरणात दापोली बँकेतील प्रोजेक्ट मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणात पोलिसांनी जवळपास 200 लोकांची चौकशी केल्याची माहिती आहे.

मात्र आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर गेलं आहे. निलीमा चव्हाण मृत्यूप्रकरणात दापोली बँकेतील प्रोजेक्ट मॅनेजरला अटक करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरु आहे. या चौकशीतून नेमके काय धागेदोरे समोर येतात हे पाहावं लागणार आहे.

निलीमा चव्हाणला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत दापोली बँकेच्या प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील ओमळी या गावातील असलेली नीलिमा चव्हाण ही दापोली येथील स्टेट बँकेच्या शाखेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होती.

मात्र बँकेचा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव टाकत होता अशी माहिती समोर आलीय. नीलिमाने आपला प्रामाणिक प्रयत्न करून देखील तिला काम जमत नसल्याचे बोलून, कामावरून काढून टाकण्याबाबत धमकी दिली होती. यामुळे ती टेंशनमध्ये होती.

ज्यावेळी सुट्टीला घरी जायची तेव्हा घरामध्ये व्यवस्थित जेवत नसल्या बाबत फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे. आपल्या मुलीस दिवसाला 4-5 डी-मॅट खाती उघडण्याकरिता प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड हा जाणून बुजून दबाव आणत होता. हा सर्व प्रकार नीलिमा आपल्या भावाला अक्षयला सांगत असे.

अनेक दिवपासून याच कारणाने ती तणावाखाली होती. गेल्या दिवसापासून करत असलेल्या तपासात ही पहिली अटक आहे. त्यामुळे या तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्व्याचं ठरणार आहे.

दाभोळ पोलिसांनी आजवरच्या तपासात खालील बाबी निष्पन्न केल्यात

नीलिमा हिच्या Viscera ची डॉक्टरांनी सामान्य व विशिष्ट रासायनिक चाचणी अंती कोणत्याही प्रकारचे विष दिसून आले नसल्याचे तपासणी अहवालामध्ये नमूद केले आहे

आत्तापर्यंत पोलीसांमार्फत चिपळूण, खेड व दापोली येथील एसटी स्थानक, रेल्वे स्थानक व इतर ठिकाणचे CCTV footage ची पडताळणी करण्यात आली.

या अकस्मात मृत्यूचा पोलीस तपास सुरू असताना दिनांक 17/08/2023 रोजी चिपळूण पोलीस ठाणे येथून दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर_17/2023 भा.द.वि. संहिता चे कलम 306 अन्वये आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्याबाबत सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल झाला होता

सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी फिर्यादीमध्ये काय म्हटलंय

आपली मुलगी दापोली येथील ज्या बँक मध्ये काम करत होती त्या ठिकाणी असणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड मुळ रा. कोल्हापुर, याला आपल्या दैनंदिन कामकाजाबाबत रिपोर्टिंग करावे लगत असे व ऑफिस मध्ये तिच्या कामाबाबत मॅनेजर संग्राम गायकवाड याच्याकडून नेहमी 15 दिवसांचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता तिला वारंवार सुट्टीवर असतानादेखील फोन येत असत.आपल्या मुलीस दिवसाला 4-5 डी-मॅट खाती उघडण्याकरिता प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड हा जाणून बुजून दबाव आणत असलेबाबत सुट्टीच्या दिवशी दरवेळी आपल्याला व तिचा भाऊ अक्षय यास नीलिमा सांगत असे.

प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव घातला होता व नीलिमाने आपला प्रामाणिक प्रयत्न करून देखील तिला काम जमत नसल्याचे बोलून, कामावरून काढून टाकण्याबाबत धमकी दिली होती व यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती व घरामध्ये व्यवस्थित जेवत नसले बाबात देखील फिर्यादी मध्ये नमूद केले आहे.

सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी अन्वये दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं 17/2023 भा.द.वि.सं चे कलम 306 अन्वये भा.द.वि. संहिता चे कलम 306 अन्वये आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे तसेच यातील आरोपित संग्राम सुरेश गायकवाड, वय 26, मुळ राहणार कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, सध्या राहणार. टी.आर.पी, रत्नागिरी यास गुन्ह्याच्या कामी दिनांक १७/०८/२०२३ रोजी २२.२० वाजता अटक करण्यात आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *