दापोली : माझ्या लग्नाला 40 वर्ष झाली अजून पाण्याचा पत्ता नाही,पाणी नाही म्हणून मुलांना मुंबईत पाठवते,दापोलीत दुष्काळजन्य परिस्थिती

banner 468x60

राज्यातील सर्वात जास्त पाऊस कोकणात पडतो. मात्र उन्हाळा आला की, कोकणातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या नावाने बोंब असते.  

कोकण कट्टा लाईव्हचा ग्राऊंड रिपोर्ट 👇🏻

अनेक वाड्या वस्त्यांमध्ये टँकर्सनी पाणीपुरवठा केला जातो.एवढा पाऊस पडूनही, कोकणात ही पाणीटंचाई का? हा प्रश्न इथल्या राजकीय नेत्यांना अद्याप सोडवता आला नाहीय. दापोली तालुक्यातील दाभोळ खाडी किनारी वसलेल्या ओनणवसे गावातील 12 वाड्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ओनणवसे गावातील 12 वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली

असून दापोलीत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालीय. रश्मी शिरगावकर यांनी सांगितलं माझ्या लग्नाला 40 वर्ष झाली अजूनही पाण्याचा पत्ता नाही. आम्ह्याला पाण्यासाठी दिवसा रात्री मरमर करावी लागतेय .

महिलांना हंडाभर पाण्यासाठी आजही भटकंती करावी लागत आहे. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ओनणवसे गावाच्या पायथ्याशी विस्तीर्ण दाभोळ खाडी, गर्द हिरवी झाडी ,डोंगर उतारावर वस्ती सगळं काही विलोभनीय आहे मात्र याचा गावाला निसर्गाने भरभरून दिले

असलं तरीही भीषण पाणी टंचाई या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यात पाणीटंचाई अधिक तीव्र झाल्याने महिलां चांगल्याच आक्रमक झाल्यात गुडघे नदी पऱ्यावर नळ पाणीपुरवठा करणाऱ्या सुमारे 30 वर्षांपूर्वीच्या तीन विहिरी आहेत.

कशीबशी या विहिरीवर त्यांची तहान भागवली जाते , जानेवारीनंतर तीनही विहिरीचे पाणी तळाला जाते,आणि लोकांची पाणीटंचाई सुरू होते. मार्च ,एप्रिल, मे महिन्यात लोकांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागते. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैल भर पायपीट करावी लागते .

वेळप्रसंगी रात्री अपरात्री पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागते ,दाभोळ खाडी पलीकडच्या गावातून होडीने पाणी आणण्याची वेळही येते.सर्व कामे सोडून केवळ पाण्यासाठी पायपीट सुरू असते ,

उन्हाळ्यात पऱ्या कोरडा पडतो भीषण पाणीटंचाई सुरू होते , नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणी तळाला जाते, त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागते, परंतु या पर्यावर आधीच्या तीन विहिरी असताना विहिरीच्या

वरील बाजूस भाटी गावाची जलजीवन मिशनची विहीर खोदली जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे , या विहिरी मुळे पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे.


त्यामुळे याठिकाणी नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे. महिलांच्या व्यथा सरकार दरबारी कधी जाणार आणि पाण्याचा जाचातून त्यांची सुटका कधी होणार हे पाहावं लागेल

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *