चिपळूण : अल्पवयीन मुलीला धमकावत नराधमाकडून वारंवार अत्याचार

banner 468x60

जिल्ह्यातील (Chiplun) एका गावात अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) वारंवार बलात्कार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरलं आहे.

संबंधित व्यक्तीवर चिपळूण पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा (POCSO Act) दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. पीडितेचे नातेवाईक आणि कामाच्या निमित्ताने बेळगावहून जिल्ह्यात आलेल्या पन्नासहून अधिक महिलांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली. त्याआधी याबाबत बैठक सुरू होती.

banner 728x90

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १४ वर्षाची आहे. तिचे वडील मजुरी करतात. संशयित व्यक्तीची जिल्ह्यातील एका गावात भातशेती आहे. आठ दिवसांपूर्वी संशयित व्यक्तीने आपल्या पत्नीला भात कापण्यासाठी शेतावर पाठवले आणि तो घरातच थांबला. पत्नीला संशय आल्यानंतर पत्नी पुन्हा घरी आली तेव्हा ती अल्पवयीन मुलगी आणि संशयित व्यक्ती घरात एकत्र आढळले. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या पत्नीने घरात गोंधळ घातला.

त्यामुळे गावातील लोक जमा झाले आणि ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर गावात बैठक झाली. संशयित व्यक्तीला गावातील प्रतिष्ठित लोकांनी जाब विचारला तेव्हा त्याने बैठकीत कबुली दिली; मात्र संबंधित पीडित अल्पवयीन मुलीने संशयित व्यक्तीने धमकावून चार ते पाचवेळा अत्याचार केल्याचे बैठकीत सांगितले.

गावच्या बैठकीत या विषयावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे मुलीचे नातेवाईक आणि कामाच्यानिमित्ताने बेळगावहून जिल्ह्यात आलेल्या पन्नासहून अधिक महिलांनी चिपळूण पोलिस ठाण्यावर मंगळवारी सकाळी धडक दिली. त्यानंतर संशयित व्यक्तीच्या विरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *