दाभोळमध्ये कासव वाचविण्यासाठी नेटफिश एमपीडाचं मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.
कोळंबी पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॉल जाळ्यांना कासव अपवर्जक साधन हे उपकरण न लावल्यामुळे अमेरिकेने मागील पाच वर्षांंपासून भारतामधून निर्यात होणाऱ्या सागरी कोळंबीवर बंदी घातली आहे.
त्यामुळे भारताला वार्षिक ४ हजार 400 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण- नेटफिश संस्थेच्या वतीने राज्यातील ट्रॉलर धारक मच्छिमारांसाठी TED वापरा संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं .
मच्छीमारांना टीईडीचा वापर सुरू करण्याचे आवाहन करण्यात आलंय. समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण आणि नेटफिश संस्थांच्या वतीने 04 ऑक्टोबर 2024 रोजी दाभोळ खाडी मच्छिमार सहकारी सोसायटी लिमिटेट, दाभोळ येथे सकाळी 10.30 ते दुपारी 01.00 या कालावधीत ट्रॉलर बोट मालकांसाठी कासव अपवर्जक साधन विषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
सुनील दाभोळकर, दाभोळ खाडी मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दिलीप तवसाळकर प्रमुख पाहूणे म्हणून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संतोष कदम यांनी “भारतात टर्टल एक्सक्लुडर डिव्हाईस (TED) चीं रचना, क्षेत्र प्रात्यक्षिक आणि अंमलबजावणी” या विषयावर मराठी भाषेत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिलं.
एकूण 25 ट्रॉलर मालकांनी जनजागृती कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांच्या फायद्यासाठी असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल MPEDA-नेटफिश संस्थेचे आभार मानले. प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान उपस्थित मच्छिमारांना
एमपीडा-नेटफिशचे लोगो आणि “टेड वापरा, कासव वाचवा” असा संदेश असणारे टि-शर्ट्स चे वितरण करण्यात आले. टीईडी विषयी मराठी भाषेत माहितीपत्रके वाटली मिलिंद चोगले, एच.डि.सी., नेटफिश संस्था यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहाय्यकाची भूमिका बजावली.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*