कोकणवासियांची मुंबई- मडगाव ‘वंदे भारत’ला पसंती!

banner 468x60

कोकण मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला कोकणवासियांच्या प्रतिसादाचा आलेख दिवसागणिक वाढतच आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

वंदे भारत एक्स्प्रेसला ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत प्रवाशांनी ९५ टक्के पसंती दिली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास महागडा असूनही प्रवाशांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे रेल्वेच्या तिजोरीत भर पडत आहे.

२८ जूनपासून कोकण मार्गावर धावणारी आलिशान वंदे भारत एक्स्प्रेस कोकणवासियांच्या पसंतीस उतरली आहे. कोकण मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या आरंभानंतर केवळ ‘क्रेझ’ म्हणून प्रतिसाद लाभत असल्याची ओरड सुरू होती.

मात्र, प्रत्यक्षात वंदे भारत एक्स्प्रेसमधील अत्याधुनिक सुविधांसह वेगवान प्रवासामुळे एक्स्प्रेसच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसागणिक उंचावतच आहे. रेल्वे प्रशासनाला वातानुकूलित एक्स्प्रेस चालवण्यासाठी अपेक्षित असलेली किमान उत्पन्नमर्यादाही वंदे भारत एक्स्प्रेसने यापूर्वीच ओलांडली आहे.

कोकण मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटनापूर्वीच गणेशोत्सव कालावधीतील चार दिवसांचे आरक्षण हाऊसफुल्ल होऊन एक नवा विक्रमत प्रस्थापित झाला होता. सद्यःस्थितीतही गणेशोत्सव कालावधीत धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या ९ फेऱ्यांचे आरक्षण फुल्लच झाले आहे.


याशिवाय वंदे भारत एक्स्प्रेसचे २८ ऑगस्टपर्यंतचेही आरक्षण हाऊसफुल झाले असून, प्रवाशांना प्रतीक्षा यादीवरील तिकिटे घ्यावी लागत आहेत. कोकण मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे सीएसएमटी मुंबई-मडगाव मार्गावरील एक्झिक्युटिव्ह चेअरकारचे प्रवासभाडे ३ हजार ३६० रुपये तर चेअरकारचे तिकीट १ हजार ८१५ रुपये आहे.मात्र, तरीही ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा ९५ टक्के प्रतिसाद लाभला असल्याची माहिती मध्यरेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *