कोकण : 18 वर्षांत वन्यप्राण्यांचा 2000 जणांवर जीवघेणा हल्ला; बिबट्याच्या तावडीत सापडले 26 जण

banner 468x60

जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांपासून वन्य प्राण्यांचे (Wild Animals) पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. प्राण्यांच्या अधिवासामध्ये मानवी अतिक्रमण आणि शिकारीमुळे पाळीव प्राण्यांबरोबर आता माणसांवरही जंगली प्राण्यांचे हल्ले वाढले आहेत.

२००६ ते २०२४ या काळात २ हजार ९०८ नागरिकांवर वन्य प्राण्यांनी हल्ले करून शेतीचे नुकसान केले. यामध्ये २६ जणांवर बिबटयाने (leopard) हल्ला केला असून दोघांचा गवा आणि डुकऱाच्या हल्लात मृत्यू झाला आहे.

वन विभागामार्फत अशा नुकसानग्रस्तांना आतापर्यंत २ कोटी ४२ लाख ४९ हजार भरपाई देण्यात आली आहे.बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगले नष्ट होत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नाहीसा होऊ लागल्याने मानवी वस्तीपर्यंत अलिकडे या प्राण्यांचा वावर वाढला आहे.

जिल्ह्यात बिबट्या, गवे, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची संख्या दिवसागणिक वाढलेली आहे. या प्राण्यांकडून पशुधनावर हल्ला केला जात आहे. शेतातील पिकांचीही नासधूस केली जात आहे.२००६ ते २०२३ नोव्हेंबर या काळात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन गमावल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पशुपालक नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना १ कोटी ५७ लाख ३५ हजार रुपयांची मदत शासनाकडून देण्यात आली. याच कालावधीत पिकांचीही वन्य पाण्यांनी मोठी हानी केलेली. त्याचा फटका ६०८ शेतकऱ्यांना बसला असून सुमारे ३८ लाख ६९ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. २०१९-२० ते २०२३-२४ नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण २६ जणांवर गंभीर ते किरकोळ स्वरूपाचे हल्ले झाले.

अशा जखमींना ४६ लाख ४५ हजारांची मदत वाटप केली.२०१९-२० यावषीं हल्ला झालेल्या १६ लोकांना ७ लाख १५ हजारांची आर्थिक मदत दिली.

२०२०-२१ मध्ये ६ जणांना ४ लाख १० हजारांची, २०२२-२३ या वर्षी ३ जणांना ३३ लाख ९५ हजारांची अन् २०२३-२४ ला एका जखमीला १ लाख २५ हजारांची मदत दिली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *