चिपळूण : मृत्यूच्या आदल्या दिवशी नीलिमा कुठे होती?

banner 468x60

नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी (Neelima Chavan Death Case) आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये प्रथमदर्शी निष्पन्न झालेल्या बाबी म्हणजे तिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार तिच्या शरीरावर कुठल्याही मृत्यूपूर्वी जखमा तसेच अंतर्गत जखमा दिसून आलेल्या नाहीत, असे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यू कशाने झाला, हे निष्पन्न होईल; परंतु घातपात झाल्याचा कोणताही पुरावा हाती लागलेला नाही, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. नीलिमा मृत्यू प्रकरणात नवे ट्विस्ट आले आहे. एकीकडे नातेवाईक घातपात असल्याचा दावा करत आहेत.

विविध संघटना, समाज या घातपाताची सखोल चौकशी करून संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या.

नीलिमा मृत्यू प्रकरणात नवे ट्विस्ट आले आहे. एकीकडे नातेवाईक घातपात असल्याचा दावा करत आहेत.

विविध संघटना, समाज या घातपाताची सखोल चौकशी करून संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्यात पडून ७२ तास झाल्याने मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातूनच डोकीवरचे केस गेले.

ही घटना घडली त्या दिवशी नीलिमा खेड बसस्थानकात आली होती. तेथे तिला मैत्रीण भेटली. दोघींमध्ये गप्पा झाल्या. मैत्रीणही चिपळूणला जाणार होती. मात्र, तिची बहीण सोबत असल्याने ती रेल्वे स्थानकाकडे निघून गेली आणि नीलिमा चिपळूणकडे जाणाऱ्‍या बसमध्ये बसली व भरणे नाका येथे उतरली. नीलिमाच्या खांद्याला बॅग होती.

ज्याने ती बॅग उचलली होती ती भीतीपोटी पुन्हा जगबुडीच्या पात्रात फेकून दिली. या बॅगेचा शोध घेण्यासाठी ८० कर्मचारी दोन दिवस जगबुडी ते दाभोळ खाडी असे सर्च ऑपरेशन करीत आहेत.

अद्याप बॅग पोलिसांच्या हाती लागलेली नाही.’’ ज्यावेळी नीलिमा भरणे पुलाकडे आली, त्यावेळी एका व्यक्तीने तिला पाहिले होते. ती व्यक्ती भरणे नाक्याकडे निघून गेली. त्यानंतर त्याच मार्गाने येणाऱ्‍या दुसऱ्‍या व्यक्तीला ती बॅग दिसली.

ज्या साक्षीदाराने ही बॅग घरी नेली त्याने बॅगेचा पहिला कप्पा उघडला असता बॅगेमध्ये तिचे आधारकार्ड व एक छोटी पर्स मिळून आली. त्या पर्समध्ये फक्त ११ रुपये होते, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

या प्रकरणात शवविच्छेदनाचा अहवाल घातपात नसल्याचे स्पष्ट करीत असल्याने व्हिसेरा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविला आहे. चार दिवसांत त्याचा अहवाल अपेक्षित असून या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे कुलकर्णी त्यांनी यावेळी सांगितले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *