दाभोळ : खाडीतील ‘तर’ सेवा सुरु करावी

banner 468x60

पावसाळी बंद केलेली दाभोळ खाडीतील प्रवासी तरसेवा (लाँच, डीपको) सुरु करावी अशा मागणीचे पत्र रत्नागिरी बंदर विभागाला वेलदूर, धोपावे-तेटले, दाभोळ या ग्रामपंचायतींसह दर्यावर्दी मच्छिमार खारवी समाज संघाने दिले आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

नवानगर-दाभोळ व वेलदूर- दाभोळ ही परंपरागत सुरु असलेली तरसेवा बंदर विभागाकडून पावसाळी हंगामात ३० आँगस्ट २०२३ पर्यत प्रवाशांच्या अडीअडचणी लक्षात न घेता शासन आदेशानुसार बंद करण्यात आली.

वेलदूर, नवानगर व धोपावे या गावातील जनतेचा दैनंदिन व्यवहार हा दाभोळ बाजारपेठेवरच अवलंबून आहे. शाळा, रुग्णालय, नोकरी, व्यवसाय व व्यवहार यासाठी दाभोळ हाच पर्याय आहे.

दाभोळ खाडीतील मूळ व्यवसाय मासेमारी असल्याने विक्रीसाठी दाभोळ हेच बंदर सुरक्षित आहे.

शिवाय दाभोळ-मुंबई ही बस सेवा या गावांसाठी खूप महत्वाची आहे. याचा विचार केल्यास वेलदूर व नवानगर येथून रिक्षाने धोपावे फेरीबोट येथे जाण्याचे झाल्यास एका प्रवाशाला २५ रु. रिक्षा भाडे व फेरीबोट तिकीट २० रु. अधिकचे भरावे लागतात.

हा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. शासनाच्या जीआरनुसार पावसाळी हंगामात ५० टक्के क्षमतेने आजपर्यंत तरसेवा विनाअपघात सुरु होती. यापुढेही ती नियमित सुरु करुन जनतेची गैरसोय दूर करावी अशी मागणी पत्राद्वारे बंदर विभाग अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *