दाभोळ : शिवसेनेची “दाभोळ” ची सुत्र रोहन तोडणकरकडे ! असंख्य महिला आणि तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

banner 468x60

आमदार योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघामध्ये माजी आमदार संजय कदम यांना शह देण्यासाठी रणनीती आखण्यास सुरूवात केलीय.

गावपातळीवर शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आमदार योगेश कदम ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. दापोलीमधील शिवसेनेच्या विस्तारासाठी हालाचालींना वेग आला आहे.

banner 728x90

उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदमांनी ठाकरे गटात प्रवेश केला. या सभेत रामदास कदम आणि योगेश कदमांना बालेकिल्ल्यातच आव्हान देण्यात आलं आहे.

संजय कदम ठाकरे गटात गेल्यानेच माझ्या 2024 च्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचं, योगेश कदम यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम ठाकरे गटात आल्यानंतर कोकणातील ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे अशी चर्चा सुरू झालीय मात्र या चर्चेला पुर्णविराम देण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

दापोली मतदार संघामध्ये दाभोळ हा महत्वाचा आणि समिश्र मतदारांचा मतदारसंघ आहे.याच मतदार संघावर आमदार योगेश कदम यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत युवा नेतृत्व उभं करण्यासाठी रोहन तोडणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आगामी निवडणुकीत युवा नेतुत्व भक्कम करण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी दाभोळमधील जाबाबदारी रोहन तोडणकरकडे सोपवली आहे. रोहन तोडणकर यांच्या नेतृत्वात दाभोळमधील बेंडलवाडी, खारवाडी आणि दालभेश्वर पाखाडी याठिकाणच्या असंख्य महिला आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्या नम्रता तोडणकर, ग्रामपंचायत सदस्य. रफिक सारंग, माजी ग्रा. प. सदस्या सुप्रिया यादव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दाभोळमधील अनेक तरूण तरूणींचा शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. 2019 च्या निवडणूकीत आमदार योगेश कदम यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता, हाच प्रतिसाद कायम ठेवण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी दाभोळचं युवा नेतृत्व भक्कम करण्यासाठी दाभोळची सुत्रे रोहन तोडणकर यांच्याकडे दिली आहेत.

दाभोळमधून आमदार योगेश कदम यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता ही ताकद आणखी वाढवण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्व्याचा मानला जातोय.

त्यामुळे आगामी विधानसभेची तयारी आमदार योगेश कदम यांनी सुरू केली असून युवा नेतृत्व सक्षम करण्यासाठी गावपातळीवर कदम यांनी लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत दाभोळ आणि आमदार योगेश कदम यांची समीकरणं कशी जुळूण येणार हे पाहणं महत्वाचं आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *