नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचे धक्कादायक खुलासे दिवसेंदिवस समोर येत असून नीलिमाच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. नीलिमा शेवटचे त्या दांपत्याला भेटल्यानंतर एक मुलगी तिच्या हाताला धरून बसमध्ये चढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
तसेच नीलिमा चव्हाण ही एका तरुणाला शेवटचं भेटली होती अशी ही माहिती समोर येऊ लागली आहे. काही दिवसापूर्वी निलीमाने एका तिच्या मित्राला मी जीवनाला कंटाळले आहे असा मेसेज केला असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.
http://हे ही वाचा : चिपळूण : निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण, शवविच्छेदन अहवालात मोठी माहिती उघड https://kokankattanews.com/kokankatta-live-nilima-chavan-news/
यामुळे नीलिमा चव्हाणच्या घातपाताचा संशय अधिक बळावला आहे. नीलिमा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी दोन तरुण पोलिसांच्या रडारवर आहेत. त्या दोन तरुणांची पोलिसाकडून कसून चौकशी सुरू आहे.
तर या प्रकरणात संशयित म्हणून ज्या जोडप्याचे सीसीटीव्ही फुटेज वायरल झाले होते त्यांना सध्या तरी पोलीस तपासातून क्लीनचीट मिळाल्याचे बोलले जात आहे. नीलिमा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून नीलिमाचा घातपात की आत्महत्या लवकरच उघड होणार आहे.
पोलीस नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचे सर्व पैलू तपासत आहेत. सध्या तिच्या एका sms ने आणखी गूढ वाढले. मी जीवनाला कंटाळले असा मेसेज मित्राला केल्याने तपासाची दिशा बदलली असून , चिपळूण ,खेड दोन ठिकाणी तिचे लोकेशन आढळून आले होते. त्यामुळे पोलीस तपासात कोणते धागेदोरे समोर येतात अवघ्या काही दिवसातच कळून येणार आहे.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज रत्नागिरी येथे नीलिमा चव्हाण च्या नातेवाईकांना रत्नागिरी येथे बोलावून घेतले. त्यांना या प्रकरणातील तपासाची माहिती दिली जाणार आहे. तसेच त्यांच्याकडून काही गोष्टी पोलिसांना जाणून घ्यायचे आहेत.
नीलिमा एका पायाने जखमी झाली होती तिच्या पायात लोखंडी राड टाकण्यात आला असल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वी नीलिमाला दोन स्थळ आले होते मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणावर भाष्य करणे टाळले असून त्यांचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*