रायगड जिल्ह्याच्या वतीने बुधवारी वाकण येथे पत्रकार परिषदेचे नेते एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महामार्गाच्या दुरवस्थेबाबत बोंबाबोंब आंदोलनं छेडण्यात आले.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
या आंदोलनाला चिपळूणचे पर्यावरणप्रेमी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी पाठिंबा दिला.या पार्श्वभूमीवर त्यांनी चिपळूण येथे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
मुकादम यांनी विचारलेल्या प्रश्नांची देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.मुकादम यांनी महामार्गावरील खड्डे,अपूर्ण असलेले काम, रस्त्यावर झालेला चिखल यामुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण?
अपघाती अनेकांचे मृत्यू होतात याची जबाबदारी कोण घेणार,मृत्यू एवढा स्वस्त झाला आहे काय?आमदार भास्करशेठ जाधव व आमदार शेखर निकम यांच्या सोबत झालेल्या बैठकीत जे ठरले त्याचे काय झाले.आपण कोणाचेच ऐकत नाही हे आता पुढे चालणार नाही.
केवळ लोकांच्या भावनांशी खेळण्याचे आपण काम करीत आहात.महामार्गावर लावण्यात येणारी झाडे ही ऑक्सिजन देणारी असावीत असे ठरले होते आपण त्याचे काय केले?ती कधी लावणार?तुम्ही कंपनीला अ पत्र देता पण ती ठेकेदार कंपनी ऐकत नाही.गणपती जवळ आले आहेत अ चाकरमानी येतील त्यांना काय तोंड दाखवणार?
ते कंपनीवाले खड्डे स भरतच नाहीत या बाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना निरुत्तर केले.शांत संयमी असणाऱ्या श्री.मुकादम यांचा पारा चढलेला अधिकाऱ्यांनी प्रथमच
पाहिला.नागरिकांच्या संतप्त भावना त्यांच्या चेहन्यावर दिसत होत्या.आपला क्रोध ते थांबवू शकले नाही आपणास शक्य झाले नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा असा इशाराही श्री.मुकादम यांनी दिला.
बहादूरशेख येथील पिकअपशेड केवळ कापडाची करून आपण लोकांची समजूत केली हे योग्य नाही.तेथील महिला स्वच्छता गृहाचे काय झाले.२० कि.मी.वर स्वच्छतागृह बांधण्याचे काय झाले असे अनेक प्रश्न विचारून मुकादम यांनी अधिकाऱ्यांना भांडावून सोडले.यामुळे अधिकाऱ्यांचे चेहरे गोरेमोरे झाले.
मुकादम यांचा हा आवेश पाहून अधिकारी आवाक् झाले.यावेळी त्यांच्याबरोबर माजी सरपंच चंद्रकांत सावंत,भरारी पथकाचे विकास जोरवेकर,आ.निकम यांचे स्वीय सहाय्यक रुपेश इंगावले,अमित जाधव आदी उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*