चिपळूण : 6 नेपाळी नागरीकांसह दीड किलो गांजा जप्त!

banner 468x60

चिपळूण येथील अमली पदार्थविरोधात झालेल्या कारवाईनंतर पोलिस दलाने जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

banner 728x90 banner 728x90

त्याचाच एक भाग म्हणून आज सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शहरातील मिरकरवाडा येथे कोंम्बिग ऑपरेशन करून दीड किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी ६ नेपाळ्यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थांची जोरदार तस्करी आणि विक्री सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आले. या विरोधात जिल्हा पोलिस ॲक्शन मोडवर येऊन त्यांनी कारवाई सुरू केली.

गेल्या दोन महिन्यांमध्ये सात ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चरस, हेरॉईन आणि गांजा असे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच चिपळूण शहरातील अशाचप्रकारे भरवस्तीतील एका बंद इमारतीमध्ये गांजाचे सेवन करून नशेत असलेल्या चौघांना ताब्यात घेतले होते.

अमली पदार्थांचा वाढता विळखा लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये कोंम्बिग ऑपरेशन करत अमली पदार्थांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे.

स्थानिक शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून, शहरातील मिरकरवाडा येथे छापा टाकण्यात आला. यामध्ये पोलिसांनी कारवाईत दीड किलो गांजा जप्त केला आहे; तर ६ जणांना ताब्यात घेतले आहेत. यावरून रत्नागिरी शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची खरेदी, विक्री होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *