चिपळूण : कुंभार्ली घाटामध्ये जखमी आवस्थेत आढलेल्या सांबराच्या पिल्लाला जीवनदान

banner 468x60

कुंभार्ली घाट येथे जखमी अवस्थेमध्ये सांबराच्या पिल्लावर उपचार करून त्याला वन विभागाने जीवनदान दिले आहे.

banner 728x90

चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाट येथे जखमी अवस्थेमध्ये सांबर जातीचे पिल्लू असल्याची माहिती २० ऑक्टोबर रोजी घाटमाथा येथील पोलीस चौकीतील कर्मचारी इम्पाल यांनी दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली.

कळविलेल्या माहितीचे अनुषंगाने वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहचून सदर जखमी सांबर जातीच्या पिल्लांस वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षीतरित्या ताब्यास घेवून सांबर जातीच्या पिल्लाची पाहणी केली असता त्याचा डाव्या पायाच्या मांडीवरती जखम दिसून आली.

पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. कानसे यांजकडून औषध उपचार करुन ती सुरक्षित असल्याची खात्रीकरून दि. २१/१०/२०२३ रोजी नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडून देण्यात आले. या बचावकार्यात राहूल गुंठे वनरक्षक कोळकेवाडी, निलेश बापट, मानद वन्यजीव रक्षक, नंदकुमार कदम, वहानचालक यांनी सांबर जातीच्या पिल्लास ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात सोडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *