चिपळूण : रुम देण्याच्या बहाण्याने 10 हजारांची फसवणूक

banner 468x60

मुंबईत भाड्याने हॉटेलवर रूम देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने चिपळूणमधील नागरिकाची सुमारे १० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

ही घटना ६ ऑक्टोबरला ही घटना घडली. मार्कंडी येथील एका व्यक्तीने चिपळूण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या मुलीला मुंबईमध्ये भाड्याने राहण्यासाठी रूम हवी होती.

banner 728x90

संबंधित व्यक्तीने गुगलवर पेईंगगेस्ट या वेबसाईटवर चौकशी केली असता मुंबईतील कुमार गुप्ता याने चिपळूणमधील संबंधित व्यक्तीला मोबाईलवरून संपर्क केला आणि गुगल पेवरून १० हजार ६७ रुपये मागून घेतले;

मात्र रूम दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने चिपळूण पोलिसात तक्रार दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *