Chiplun Bridge Collapse: चिपळूणमधील  निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला नागरिकांची पळापळ, पाहा थरारक घटनेचा VIDEO

banner 468x60

चिपळूणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळलाय.

बहादुरशेख नाका येथील फ्लायओव्हरला आधीच तडे गेलेत. त्यात आज सकाळी पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

banner 728x90

(Latest Marathi News) गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचं काम सुरु आहे. याआधी गर्डरमुळे महामार्गावर धोका निर्माण झाला होता. आता या पुलाचे बांधकाम सुरू असताना धोका निर्माण झालाय.

काम सुरु असलेल्या पुलाच्या आतील सळ्या दिसू लागल्यात. पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला असं तेथील काही नागरिकांनी म्हटलंय.

घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *