चिपळूण : बांगलादेशी 8 वर्षे चिपळूणमध्ये, पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

banner 468x60

बांगलादेशातून (Bangladesh) भारतात अवैधरित्या घुसखोरी केलेल्या तिघांना चिपळूण पोलिसांनी (Chiplun Police) खेर्डी येथून ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे देखील हे कुटुंब वास्तव्याला होते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) मदतीने तपास केला जात आहे. हे कुटुंब भारतात गेल्या १० वर्षांपासून वास्तव्याला आहे. त्यांच्या कुटुंबात ११ सदस्यांचा समावेश आहे.

दोन दिवसांपूर्वी खेर्डी येथून गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांगलादेश) या तिघांना रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर या तिघांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले होते.

त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांची चिपळूण पोलिसांनी कसून चौकशी केली असतानाच ते खेर्डी येथे राहण्यापूर्वी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दोन अडीच वर्षे वास्तव्याला होते. त्यानंतर खेर्डी मोहल्ला येथे गेल्या आठ वर्षांपासून ते वास्तव्याला आहेत.

तीन खोल्यांमध्ये हे कुटुंब वास्तव्य करीत आहे. त्यांच्या कुटुंबात महिला व मुलांसह ११ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून १५ हजार रुपये रोकड, प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीचे मोबाईल, आधार कार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र जप्त केले आहे.

त्यांच्याकडील या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. मुल्ला कुटुंब खेर्डी येथे बांधकाम क्षेत्रात सेंट्रिंगची कामे करतात. संपुर्ण कुटुंब या कामात आहेत.

नवी मुंबई येथे देखील हेच काम ते करत होते. त्यामुळे चिपळूण पोलिसांच्या पथकाने कोपरखैरणेसह मुंबई क्षेत्रात संबंधित कुटुंबापैकी कोणावर गुन्हा अथवा तक्रार दाखल आहे का, तसेच ते कोणत्या मार्गाने भारतात आले, घुसखोरी कशा पद्धतीने केली. अशा अनेक प्रश्नांचा उलगडा केला जात आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *