चिपळूण : टेरव ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

banner 468x60

टेरव येथील जलजीवन मिशन योजनेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी येथील ग्रामस्थांनी गेल्या २३ दिवसांपासून सुरू केलेल्या उपोषणावर अद्याप तोडगा निघालेला नाही.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

banner 728x90

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

प्रशासन संबंधितांवर कारवाई करीत नसल्याने दि. ११ पासून बेमुदत उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

टेरव ग्रामपंचायतीत गेल्या सात वर्षाच्या कालावधीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी शासकीय नियमांना बगल देत कामे केली. पंचायत समितीने केलेल्या चौकशीत ग्रामपंचायतीने विकासकामे करताना अनेक प्रशासकीय बाबींचा अवलंब केला नसल्याचे उघड झाले.

विकासकामांचा ठेका देताना संबंधित ठेकेदाराकडून सुरक्षा अनामत, फॉर्म फी घेतली नाही. साहित्य खरेदीतही ई निविदा प्रक्रियेचा अवलंब न करता त्याला फाटा देत लाखोंची खरेदी केली. यावरून तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना नोटीसा दिल्या होत्या.

त्यांचा खुलासा आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल जि. प. ला दिला आहे. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. जलजीवन मिशनच्या पाणी योजनेतही ग्रामस्थांची तक्रार होती.

याबाबत ३० ऑगस्टला दापोली येथील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. व्ही. बुटाला व एस. एन. आनंदे यांनी पाहणी केली होती. ते जि. प. ला चौकशी अहवाल देणार होते. मात्र, तो दिला की नाही याची उपोषणकर्त्यांना माहिती मिळालेली नाही.

एकूणच साखळी उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने आता आमरण उपोषणाचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन ६ सप्टेंबरला देण्यात आले. टेरव येथील एकनाथ माळी, बारकू मोरे, विजय तांदळे, कृष्णा कुंभार, रामचंद्र शिरकर, सोमा म्हालीम, विष्णू लाखण, रमेश माळी, जयराम म्हालीम, परशुराम फागे, अनंत कराडकर, राजेंद्र म्हालीम, रामचंद्र पंडव आदी ग्रामस्थ आमरण उपोषण करणार आहे.

शुक्रवार, ८ रोजी उपोषणकर्त्यांना जि. प. ने म्हणणे मांडण्यासाठी बोलावले आहे. या बैठकीत कोणता निर्णय होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *