चिपळूण आगारातून सुटणारी चिपळून रत्नागिरीच्या एसटी गळत असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. यामुळे प्रवाशांना उभ्याने प्रवास कारावा लागलाय.
🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
MH 14 BT 2969 चिपळूण आगराची सकाळी 6,45 सुटणारी चिपळूण रत्नागिरी गाडी चालकाच्या बाजूची पूर्ण बाजू गळत असल्याने गाडीत जागा असूनही प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रिद वाक्य घेऊन प्रवासी वाहतूक करणारे एसटी महामंडळ बसच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष मात्र देत नाही. ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बस गळक्या असून त्यातूनच प्रवाशांना दररोज प्रवास करावा लागत आहे.
दररोज रस्त्यांवर धावणाऱ्या या बसमधील अनेक बसची अवस्था वाईट झालेली आहे. या बसेसची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करूनच प्रवासी वाहतूक करावी, असे आदेश महामंडळाकडून देण्यात आले होते.
थोडासा पाऊस जरी पडला तरी बसच्या छतामधून थेट प्रवाशांच्या अंगावर पाण्याचे थेंब पडू लागतात. काही बसमधून तर पाण्याची धारच आतमध्ये येते. अशाच स्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*