मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित परशुराम घाटातील अतिशय कठीण कातळ फोडण्यासाठी तब्बल नऊ महिने लागले.
🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
आता कातळ पूर्णपणे फोडण्यात यश आल्यानंतर तेथे रखडलेल्या दुसऱ्या लेनच्या काँक्रिटीकरणाचे काम तातडीने सुरु केले आहे. आता परशुराम घाट ते आरवली दरम्यानच्या ३६ किलोमीटर अंतरात केवळ सव्वा किलोमीटरचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे.
गणेशोत्सवापूर्वी उर्वरित काम मार्गी लागल्यास चिपळूण हद्दीत महामार्गावरील प्रवास सुसाट होणार आहे. गेली अनेक वर्षे परशुराम घाटातील चौपदरीकरण विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरले.
जमिनीचा मोबदला व मालकीवरून वाद निर्माण झाल्याने हे काम अडचणीत आले होते. मात्र, आता घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. घाटातील चिपळूण हद्दीतील इगल इन्फ्रा कंपनीने याआधीच काम पूर्ण केले.
परंतु, खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनी मार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन अनेक दिवस थांबले होते. याठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता.
मात्र, आता कातळ फोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या दुसऱ्या लेनचे काम देखील वेगाने सुरु झाले आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील दुसराही मार्ग सुरू करण्यावर भर दिला जात आहे.
त्याप्रमाणे कामाला गती मिळण्यासाठी आधी पावसाळ्यात महामार्गावर आलेली दरडीची माती हटविण्यात येत आहे. त्यानंतर काँक्रिटीकरणाचे कामही तातडीने हाती घेण्याचे नियोजन केले आहे.
त्यासाठी मागील तीन दिवस सातत्याने सपाटीकरणाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत काँक्रिटीकरण पूर्ण करून घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जाणार आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*