चिपळूण : सेक्स्टॉर्शनच्या छळाला कंटाळून 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, सेक्सटॉर्शनपासून वाचायचे कसे?

banner 468x60

चिपळूण तालुक्यात शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीवरे येथील एका १९ वर्षीय युवकाने याच प्रकाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक व प्रकार घडला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

९ ऑगस्ट रोजी या तरुणाने सेक्स्टॉर्शनच्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आता चिपळूण पोलिसांनी राजस्थान येथील तीन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या धक्कादायक घटनेमुळे चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तिवरे या गावातील एक युवक सेक्सटॉर्शनच्या कचाट्यात सापडला आणि ब्लॅकमेल आणि धमकीमुळे शेवटी त्याने आत्महत्या केली. आतापर्यंत मुंबईसारख्या शहरात घडणाऱ्या या घटनांचे लोण आता ग्रामीण भागापर्यंत पसरले आहे.

राजस्थानातील एका टोळीने चिपळूण तालुक्यातील तिवरे या गावातील एका युवकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवले. त्याचे अश्लील व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैशाची मागणी केली सदर तरुणांनी ११ हजार रुपयांची खंडणीही दिली.

परंतु त्रास वाढू लागल्यानंतर त्याला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.

या प्रकरणी राजस्थान येथील १८ वर्षीय तरुणासह अन्य तिघे अनोळखी मोबाईल क्रमांक धारकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. किशनराम भन्वरलाल पातीर (१८, बिकानेर-राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. १९ वर्षीय तरुणाशी सेक्स्टॉर्शन करणाऱ्या टोळीने चिपळुणातील त्या तरुणाशी सोशल मिडीयाव्दारे ओळख केली.

तसेच त्याच्यासोबत अश्लिल व्हिडोओद्वारे संपर्क केला. त्यानंतर मात्र त्याचे स्क्रीनशॉट तसेच व्हिडीओ रेकॉर्ड करुन त्याद्वारे या तरुणाला ब्लॅकमेक करत हे फोटो व व्हिडीओ युट्युबरवर अपलोड करण्याची तसेच सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी दिली होती.

याशिवाय गुगल कंपनीकडून बोलत असल्याचे भासवून तसेच पोलीस विभागाकडे तक्रार केल्याची भिती दाखवली. त्यानंतर हा व्हिडीओ व फोटो सोशल मिडीयावर अपलोड न करण्यासाठी तसेच पोलीसांकडे तक्रार दाखल न करण्यासाठी चिपळुणातील या तरुणाकडून ११,५०० रुपयांची खंडणीची मागणी केली गेली.

ही रक्कम त्या तरुणाने ऑनलाईन पाठवली. तरी देखील त्यास ते अश्लिल फोटो-व्हिडीओ युट्युबवरती तसेच सोशल मिडीयावर अपलोड करण्याची वारंवार भीती दाखवली जात होती. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण तालुका पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे करत आहेत.

सेक्स्टॉर्शन म्हणजे काय?


सेक्स + एक्स्टॉर्शन (Sex + Extortion) यावरून सेक्स्टॉर्शन हा शब्द आलाय. म्हणजे सेक्सचा वापर करत ब्लॅकमेल करून वा दबावाखाली आणत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणं.

सेक्सटॉर्शनच्या अशा 682 घटना पुणे शहरात 2021 या एका वर्षात समोर आल्या आहेत. हा आकडा ज्यांनी समोर येऊन सायबर पोलिसांकडे तक्रार केली त्यांचा आहे. ज्यांनी तक्रार केली नाही अशांची संख्या अधिक असण्याची शक्यता सायबर पोलीस व्यक्त करतात.

सध्या प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्याने त्यातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार देखील वाढलं आहे. सावज शोधून त्याला अडकवून पैसे वसूल करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. याप्रकारांमुळे अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय तर काही लोक बदनामीच्या भीतीमुळे नैराश्यात देखील जात आहेत.

सेक्सटॉर्शनपासून वाचायचे कसे?
दिवसभरात आपल्याला शेकडो मेसेजेस व्हॉट्सअॅप, फेसबुकवर येत असतात. अनेक अनोळखी लोकांच्या फ्रेंण्ड रिक्वेस्ट सुद्धा आलेल्या असतात. त्यामुळे आपली फसवणुक टाळण्यासाठी सोशल मीडियावर वावरताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

दगडू हाके सांगतात, ”ज्यांची फेसबुकची सिक्युरिटी वीक आहे अशांना अनेकदा टार्गेट केलं जातं त्यामुळे फेसुबकची सुरक्षा वाढवली पाहिजे. अनोळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट आली तर ती खात्री करुन स्विकारा किंवा ती स्विकारण्याचे टाळा. अनोळखी नंबरवरुन मेसेज आला तर त्याची खातरजमा करुनच त्यावर रिप्लाय करा. अनोळखी नंबरवरुन व्हिडीओ कॉल आला तर तो स्विकारु नका. सेक्सटॉर्शनच्या केसेसमध्ये फसवणुक करणाऱ्याने असे व्हिडीओ कुठे पोस्ट केल्याचे फारसे दिसून येत नाही. केवळ पैसे उकळण्यासाठी धमकावले जाते. त्यामुळे अशी फसवणुक झाली तर सायबर पोलीस स्टेशनला तक्रार करा.”

… हे अवश्य ध्यानात ठेवा

समाज माध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत जपून मैत्री करा.

अनोळखी व्यक्तीचे ‘व्हिडीओ कॉल’ स्वीकारू नका.

अनेकदा तरुणांना फसवण्यासाठी आकर्षक तरुणींच्या चेहऱ्याचा वापर होतो.

एखादा ‘न्यूड कॉल’ चुकून स्वीकारला तर अधिक काळ बोलू नका.

लैंगिक छळाचा आरोप, बदनामीची भीती दाखवून पैशाची मागणी होते.

खंडणी मागितल्यास आर्थिक व्यवहार करू नका.

सेक्सटॉर्शनच्या अशा शेकडो घटना 2021 पासून समोर आल्या आहेत. हा आकडा ज्यांनी समोर येऊन सायबर पोलिसांकडे तक्रार केली त्यांचा आहे. ज्यांनी तक्रार केली नाही अशांची संख्या अधिक असण्याची शक्यता सायबर पोलीस व्यक्त करतात.कारण बरेच लोक प्रतिष्ठा आणि इज्जती पोटी तक्रार दाखल करत नाही.

सध्या प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्याने त्यातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार देखील वाढलं आहे. सावज शोधून त्याला अडकवून पैसे वसूल करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. याप्रकारांमुळे अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय तर काही लोक बदनामीच्या भीतीमुळे नैराश्यात देखील जात आहेत.या नैराश्यातुन आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे.

असे लैंगिक शोषण टाळा

पॉर्न साइट्स सर्च करू नका. फक्त सुरक्षित वेबसाइट उघडा.
– ज्या वेबसाइटची URL लॉक करण्यापूर्वी बनवली आहे त्या वेबसाइटवर जा.
लाल लॉकने चिन्हांकित केलेली वेबसाइट उघडणे टाळा.
– फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नीट तपासा.
जर कोणी ब्लॅकमेल करत असेल तर सायबर पोलिसांकडे तक्रार करा.

जमतारा नावाची वेब सिरीज नेटफ्लिक्सवर आहे त्याप्रमाणे सॉफ्ट टारगेट शोधून लोकांना आर्थिक गंडा घातला जातो. यात मॅट्रोमोनियल साईटवरुन ओळख करुन गिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवण्याचे गुन्हे देखील अधिक आहेत.

सेक्स्टॉर्शनचे बळी ठरलेल्यांमध्ये 30 वयाच्या वरील पुरुषांचे तसेच खासकरुन लग्न झालेल्या पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

सेक्सटॉर्शनपासून वाचायचे कसे?

दिवसभरात आपल्याला शेकडो मेसेजेस व्हॉट्सअॅप, फेसबुकवर येत असतात. अनेक अनोळखी लोकांच्या फ्रेंण्ड रिक्वेस्ट सुद्धा आलेल्या असतात. त्यामुळे आपली फसवणुक टाळण्यासाठी सोशल मीडियावर वावरताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

अनोळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट आली तर ती खात्री करुन स्विकारा किंवा ती स्विकारण्याचे टाळा.

अनोळखी नंबरवरुन मेसेज आला तर त्याची खातरजमा करुनच त्यावर रिप्लाय करा. अनोळखी नंबरवरुन व्हिडीओ कॉल आला तर तो स्विकारु नका.

सेक्सटॉर्शनच्या केसेसमध्ये फसवणुक करणाऱ्याने असे व्हिडीओ कुठे पोस्ट केल्याचे फारसे दिसून येत नाही.

केवळ पैसे उकळण्यासाठी धमकावले जाते. त्यामुळे अशी फसवणुक झाली तर सायबर क्राईम ला तक्रार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *