चिपळूण : 3 बांगलादेशी नागरिकांना चिपळूण खेडमधून अटक, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

banner 468x60

भारतात बांग्लादेशातून खूसघोरी करून आलेल्या तिघांना चिपळूण खेड येथून ताब्यात घेण्यात आले. गेले काही महिने ते तेथे वास्तव्यास होते.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

त्यांच्यावर रत्नागिरीतील दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांकडून काही कागदपत्रे हस्तगत केले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांग्लादेश) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

खेर्डी मोहल्ला येथील शिगवणवाडी परिसरात ते काही महिन्यांपासून वास्तव्य करीत होते. परंतू बाग्लादेश हून भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय वास्तव्य करीत होते.

याविषयीची रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळताच त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री कारवाई करून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी त्यांची चौकशी करून तत्काळ गुन्हा दाखल केला.

पारपत्र अधिनियम ३ (ए) ६, परकीय नागरिक आदेश कायदा ३ (१) (ए) व विदेशी व्यक्ती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल उदय चांदणे, आशिष शेलार यांनी ही कारवाई केली.

यानंतर या तिघांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *