चिपळूण : चिपळूणला महापुरातून मुक्त करण्यासाठी तज्ञांची मदत घेऊ

banner 468x60

चिपळूण कायमस्वरूपी पूरमुक्त करण्यासाठी छोटे बंधारे, तलाव बांधणे आवश्यक आहेत. जल, जमिनीचे संवर्धन आवश्यक आहे. याबाबत उपाययोजना सुचवल्या आहेत. त्या चिपळूण शहराला पूरमुक्त करण्यासाठी मार्गदर्शक आहेत.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

केवळ गाळ काढून चिपळूण शहर पूरमुक्त होणार नाही. त्यासाठी तज्ञ लोकांची मदत घेऊन चिपळूण शहर कायमस्वरूपी पूरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली.

निकम म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी चिपळूणच्या वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी दहा कोटीचा निधी दिला. महायुतीच्या सरकारमध्येही अजित पवार अर्थमंत्री आहेत.

त्यामुळे गाळ काढण्यासाठी अधिकचा निधी मिळेल, यात शंका नाही; मात्र महापूर येऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याचा विचार सुरू आहे.

जंगलतोड थांबली पाहिजे, वृक्षारोपण झाले पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. डोंगराळ भागावरील माती सरकू नये यासाठी कोकण कृषी विद्यापिठाने नवीन गवताची निर्मिती केली आहे. हे गवत लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.

दाभोळ खाडी ते दहिवली खाडीपर्यंतचा जलमार्ग तयार केला जात आहे. या जलमार्गाची निविदा निघाल्यानंतर गाळ काढण्याच्या कामालाही चालना मिळेल.


गेल्या आठवड्यात मी विजापूरला गेलो होतो. तेथे पुराचे पाणी भरू नये यासाठी कालवे बांधण्यात आले आहेत. अशा प्रकारचे कालवे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात बांधले आणि पाणीटंचाई असलेल्या भागात वळवले तर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना बारमाही पाणी राहील.

त्या पाण्यावर शेती व भाजीपाला करता येईल. छोटे तलाव, धरणे गरजेचे आहे. दरड कोसळण्याचा पेढे गावात सर्वाधिक धोका आहे. या गावाचे पुनर्वसन व्हायला हवे. तळसर-मुंढे गावातील धनगरवाड्यात जाण्यासाठी ग्रामस्थांना चार तासाची पायपीट करावी लागते.

अशा डोंगराळ भागात धनगरवाड्या वस्त्या आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *