वडिलांचा फोटो घरात लावल्यानंतर तो न काढल्याच्या रागातून एका तरुणाने दोघांवर सुरीने वार केला. तसेच प्रौढाने घराच्या दरवाजासह रिक्षाच्या काचा फोडल्याची घटना तालुक्यातील डेरवण- चव्हाणवाडी येथे घडली.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
यात एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्या २ तरूणांविरूद्ध सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम प्रदीप चव्हाण (२३), दीपक श्रीराम चव्हाण (४५) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीचा शुभम हा पुतण्या तर दीपक सख्खा भाऊ आहे. दीपक ‘हा शुभम याच्याकडे राहण्यास असतो. १६ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास डेरवण- चव्हाणवाडा येथे फिर्यादी यांना शुभम याने माझ्या वडिलाचा फोटो तुमच्या घरात का लावला, अशी विचारणा करून तो काढून टाकण्यास सांगितले.
यावर फिर्यादी यांनी फोटो काढून टाकणार नाही, असे सांगितल्यावर शुभमला याचा राग आला व त्याने फिर्यादाला शिवीगाळ करून सुरीने त्याच्या हातावर वार करून जखमी केले. यावेळी हे भांडण सोडवण्यासाठी रोहित संजय चव्हाण आला असता त्याला शुभमने सुरी मारली.
Iयानंतर दीपक चव्हाण तेथे आता व त्याने धक्काबुक्की करत फिर्यादीच्या मालकीच्या रिक्षाची मागील काच, घरच्या स्लायडिंगच्या काचा, सिमेंटचा दरवाजा फोडून नुकसान केले. या प्रकरणी शुभम, दीपक या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आता आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













