चिपळूण : 16 गावांतील 40 दरडग्रस्त वाड्या भीतीच्या छायेत

banner 468x60

इर्शाळवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील दरडग्रस्त गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकीकडे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने या दरडग्रस्त भागात राहाणार्‍या लोकांचा जीव टांगणीला आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

चिपळूण तालुक्यातील पूर्व विभाग सह्याद्रीपट्ट्यात आहे. या भागात धनगर, कातकरी बांधवांसह अनेक लोकांच्या वस्ती आहेत. मात्र, पावसाळ्यात या लोकांची झोप उडाली आहे.

प्रशासनाच्या वतीने दरडग्रस्त भागातील लोकांच्या वस्तीवर नजर ठेवण्यासाठी शासकीय कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे.

तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी आपत्कालीन यंत्रणा उभी केली आहे. तालुक्यात 16 गावांतील 40 वाड्या दरडग्रस्त आहेत.

यामध्ये पेढे कुंभारवाडी, परशुराम घाट, तिवरेमधील गावठाणवाडी, कातकरवाडी, भेंद फणसवाडी, भेंद धनगरवाडी, कुंभारवाडी, गंगेचीवाडी. तिवडीमधील राळेवाडी, उगवतवाडी, भटवाडी. रिक्टोली येथील इंदापूरवाडी, मावळतवाडी, गावठणवाडी, मधलीवाडी, बौद्धवाडी, देऊळवाडी.

नांदिवसेमधील राधानगर, स्वयंदेव, वाकरी धनगरवाडी, बावलाई धनगरवाडी. कादवड येथहील धनगरवाडी. ओवळी येथील काळकाई धनगरवाडी, धामनदी धनगरवाडी, बुरंब वणेवाडी, खेंड धनगरवाडी. कळकवणेमधील रिंगी धनगरवाडी, खलिफा धनगरवाडी. पिंपळी बु. कोळकेवाडीमधील खारवार धनगरवाडी, हसरेवाडी, जांभराई धनगरवाडी, कोळवणे धनगरवाडी, माच धनगरवाडी आणि बोलादवाडी. कुंभार्ली लांबेवाडी, पेढांबे दाभाडी व रिंगी धनगरवाडी.

येगाव येथील ठोकबांव सुतारवाडी. कळंबट गवळीवाडी, गोवळकोट बौद्धवाडी व मोहल्ला. या गावातील वाड्या दरडग्रस्त आहेत. या ठिकाणी शासन सातत्याने लक्ष ठेवून आहे.

तालुक्यातील दरडग्रस्त वाड्यांमध्ये एनडीआरएफ टीमसह आपत्कालीन व्यवस्थापनच्या पथकाने भेट दिली. कादवड, तिवडी आदी ठिकाणी दरडग्रस्त भागाची पाहणी करून तेथील ग्रामस्थांना सूचना देण्यात आल्या.

तहसीलदार श्री. प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील तसेच पथकातील बी. बी. पाटील, बी. डी. कांबळी, एम. जी. केळसकर, मंडल अधिकारी, तलाठी, संबंधित गावचे पोलिस पाटील या ठिकाणी उपस्थित होते. लोकांना आपत्कालीन काळात घ्यायची काळजी याबाबत प्रशासकीय अधिकार्‍यांकडून माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *