दापोली : नॅशनल हायस्कूल मांदिवलीची ऐतिहासिक कामगिरी, रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक

banner 468x60

दि यंग पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवली येथे शिकणाऱ्या इबतिसाम फैयाज अहमद वलेले हिने इयत्ता आठवीच्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक संपादन केला.

फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांनी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. उल्लेखनीय म्हणजे इबतिसाम हिने यापूर्वी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते.

ग्रामीण सर्व साधारण गटात रत्नागिरी जिल्ह्यात दुसरा क्रमांक फटकावला. इबतिसाम च्या यशात मुख्याध्यापक फैयाज सर, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख जमादार सर, फहीमा मॅडम, रेहान खान सर व आई निगार वलेले यांचा मोलाचा हातभार होता.

यशस्वी विद्यार्थीनी व मार्गदर्शक मुख्याध्यापक फैयाज सर व शिक्षक यांना संस्था अध्यक्ष उस्मान मालवणकर, उपाध्यक्ष डाॅ.अजीज सावंत, सचिव अ.कादीर खांचे, सहसचिव अस्लम जुवळे , शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम, व्हाईस चेअरमन इक्बाल मुकादम, सदस्य जमालुददीन मुकादम व गुलाम हुसैन भारदे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मेहबूब मुकादम व ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *