दापोली : कादिवली पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचला

banner 468x60

दापोली तालूक्यातील एक महत्वाचा मार्ग असलेल्या दापोली कुडावळे कादीवली वेळवी आंजर्ले या मार्गावरील कादिवली येथे एका नदीवरील पुलासाठी नव्यानेच बांधलेल्या पुलाचा जोडरस्ता जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे खचला आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला खचलेल्या रस्त्याचे ठिकाण हे अडथळा ठरत आहे. ही परिस्थिती वाहन चालकांना समजण्यासाठी रस्ता खचल्याच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याच्या आधी पुढे धोका आहे वाहने कमी वेगाने चालवा अथवा सावकाश हाका अशाप्रकारचे दिशा दर्शक फलक हे सार्वजनिक बांधकाम विभागाने लावणे हे लोकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचे आहे.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचे काहीही पडलेले दिसत नाही आणि म्हणूनच रस्ता खचून दोन दिवस झाले तरी सार्वजनिक बांधकामला धोका असल्याबाबतचे दिशादर्शक फलक लावता आलेले नाहीत.

कादिवली या गावातूनच आंजर्ले तसेच मांदिवली गावाकडे जाणारी वाहतुक होते तसेच आंजर्ले येथून पूणे मुंबईकडे जाणारा हा मार्ग आहे. त्याचप्रमाणे मंडणगडहून पालवणी मार्गे वेळवीकडे येणारा हा महत्वाचा असा मार्ग आहे.

अशा या मार्गावर दिवसभरात किमान 10 एस.टी. बसेस धावत असतात तसे खाजगी वाहनांचीही या मार्गावर कायमच वर्दळ असते. असा हा रहदारी आणि दळणवळाच्यादृष्टीने महत्वाचा असा मार्ग आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *