गुहागर : मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आयोजित आरोग्य शिबीर संपन्न

banner 468x60

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिर आणि मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप शिबिर भवानी सभागृह शृंगारतळी,पालपेणे रोड येथे आयोजित करण्यात आला होता.

banner 728x90

या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश सावंत, सुप्रसिद्ध डॉ. राजेंद्र पवार,तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, जानवळे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे, उपसरपंच वैभवी जानवळकर,उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, शेतकरी संघटना गुहागर तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे,अमित खांडेकर, सुनील मुकनाक, सह संपर्क अध्यक्ष सुरेंद्र निकम, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी , प्रशांत साटले त्याचप्रमाणे अपरांत हॉस्पिटल चिपळूण, वालावलकर हॉस्पिटल, डेरवण, रेड क्रॉस रत्नागिरी येथील सर्व डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुहागर विधानसभा क्षेत्रामध्ये सतत जनतेसाठी विविध उपक्रम राबवत असते, त्याचाच एक भाग म्हणून मनसे १९ वा वर्धापन दिन याचे औचित्य साधून या लोकोपयोगी शिबिराचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तर्फे करण्यात आले होते.

अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये रक्तगट व आरोग्य तपासण्या व औषधे मोफत देण्यात आली. यामध्ये तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली व आहाराबद्दल मार्गदर्शन केले तसेच रक्तदाब,मधुमेह,,औषधे,इसीजी कर्करोग तपासंणी, वजन आणि आहाराबद्दल मार्गदर्शन,मोफत डोळे तपासणी ,मोफत चष्मा वाटप करण्यात आले.

रक्तदान करण्यासाठी तालुक्यातील सर्वच समाजातील नागरिकांनी रक्तदान केले. तालुक्यातील सर्व समाजातील रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान करून मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी हे करत असलेल्या लोकसेवेला हातभार लावला.

तालुक्यातील सर्व समाजातील समाज बांधव या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाल्याने एक नवा आदर्श तालुक्यात निर्माण झाल्याचे दिसले.

या शिबिराप्रसंगी गुहागर तालुक्याचे लोकप्रिय कार्य तत्पर व कर्तव्यदक्ष तहसीलदार परीक्षित पाटील, तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जांगिड व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सर्वच पक्षातील मुख्य पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

सर्वच पक्षातील कार्यकर्ते यांच्याकडून प्रमोद गांधी यांच्या उत्तुंग कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. असे समाजकार्य या पुढील काळात देखील सर्व ठेवावे असे सांगण्यात आले. तहसीलदार परीक्षित पाटील यांनीही मनसेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर याचे कौतुक केले.

.या शिबिरासाठी गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर व सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *