दापोली : निवडणुकी खर्चात योगेश कदमांचा सर्वाधिक खर्च, योगेश कदम – 6 लाख 49 हजार, संजय कदम – 1 लाख 80 हजार, संतोष अबगुल – 10 हजार 660

banner 468x60

दापोलीमध्ये सध्या रंगतदार निवडणूक पाहायला मिळत आहे. योगेश कदम आणि संजय कदम यांच्यात मुख्य लढत आहेत. मात्र मनसेचे उमेदवार संतोष अबगुल यांच्या एन्ट्रीमुळे राजकीय गणितं पूर्णपणे बदलले आहेत.

दापोली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून ७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांनी निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक पुरुषोत्तम वुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

यामध्ये मनसेचे उमेदवार संतोष सोनू अबगुल यांनी १० हजार ६६०, शिवसेना उद्धवव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय वसंत कदम यांनी १ लाख ८० हजार ७४७, शिवसेनेचे योगेश रामदास कदम यांनी ६ लाख ४९ हजार ७९६, अपक्ष उमेदवार ज्ञानदेव खांबे यांनी २३ हजार १८२, संजय संभाजी कदम आणि

संजय सीताराम कदम यांनी प्रत्येकी १० हजार ९९५, प्रवीण मर्चंडे यांनी ३६ हजार ७६०, कदम योगेश रामदास व कदम योगेश विठ्ठल यांनी प्रत्येकी ११ हजार ५०० इतका खर्च केल्याची आकडेवारी समोर आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *