चिपळूण : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील अलोरे-शिरगाव हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेपाळहून कोकणात आलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

banner 728x90

नागावे येथील एका चायनीज दुकानाला लागून असलेल्या खोलीत हा प्रकार घडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचे नाव अर्जुन लीलाबहादुर नेपाळी (वय २८) असे आहे. तो मूळचा बिसलतार (वार्ड नं. १), ता. देपचुली, जिल्हा नवलपरासी (देश- नेपाळ) येथील रहिवासी होता. सध्या तो चिपळूण तालुक्यातील नागावे येथे वास्तव्यास होता आणि तिथेच विष्णू साळवी यांच्या चायनीज दुकानात आचारी म्हणून काम करत होता. ही घटना १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.३० ते दुपारी १२.०० वाजेच्या दरम्यान घडली.

नागावे येथील चायनीज दुकानाला लागून असलेल्या खोलीत अर्जुन याने गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी १२ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला, तेव्हा तो मयत अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती विष्णू साळवी यांनी अलोरे-शिरगाव पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद (ADR No. ०१/२०२६) केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत. परराज्यातून आणि परदेशातून आलेल्या कामगारांच्या अशा मृत्यूमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *