Breaking News
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकाच्या विकासाला नवी गती! पादचारी पुलाचे भूमिपूजन, बुकिंग सेंटर आणि रेल्वे थांब्यांसाठी शेखर निकम यांचा पाठपुरावा खेड : बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा, मालवाहू रिक्षा आणि ट्रकचालकावर गुन्हा दाखल मंडणगडच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान, निवळी नदीवर बांधला बंधारा, नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार दाभोळ : पंचनदी-कोळथरेसाठी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा चिपळुण : 99 रुपयांत अस्थिविकार आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, अपरांत हॉस्पिटलतर्फे आज विशेष शिबिर!

रत्नागिरी : जिल्ह्यातील 19,462 जणांचे गृहस्वप्न साकारणार

banner 468x60

रत्नागिरी प्रत्येकाचे हक्काचे घर बांधण्याचे स्वप्न असते. परंतु अनेकजणांना आर्थिक परिस्थितीमुळे घराचे स्वप्न अधुरेच राहते. शासनाने त्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मदतीचा हात दिला आहे. जिल्ह्यात 19 हजार 462 लाभार्थी उद्दिष्ट देण्यात आले होते.

यापैकी 19 हजार 325 लाभार्थ्यांचा घरकुलांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दि. 1 जानेवारी 2025 पासून राज्यात महाआवास अभियान सुरू झाले आहे. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांचे घरकूल मंजूर केले जाणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिह्यातील 19 हजार 325 लाभार्थ्यांना घरकूल मंजुरी आदेश पत्र प्रदान करण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार करत आहे. राज्य शासनाने उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच हप्ते वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत लाभार्थ्यांना दिल्या जाणार्‍या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात घरकुलाच्या कोणत्याही लाभार्थ्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही. घरकुल योजनेच्या लाभामध्ये 50 हजार रुपयांनी वाढ करुन ती आता 2 लाख 10 हजार करण्यात आली.

भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी मदत करण्यात येत आहे. जमीन खरेदीच्या लाभामध्येही 50 हजार रुपयांची वाढ करून ती 1 लाख रुपये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *