राजापूरचा वातावरण पुन्हा खराब करण्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी प्रकरणी समाजकंटक ताब्यात

banner 468x60

सोशल मिडीयावर छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केलेप्रकरणी अब्बास मोनये नामक समाज कंटकाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून मुंबई येथुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान शनिवारी या संशयिताला राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बुधवारी होळी उत्सवात राजापूर शहरात जवाहर चौकात घडलेल्या घटनेनंतर पोलीसांनी कायदा व सुव्यस्था अबाधित राखत वातावरण शांत केलेले असताना व सर्व काही सुरळीत सुरू असताना शुक्रवारी सोशल मिडियावर तालुक्यातील नाटे गावातील अब्बास मोनये नामक एकाने छत्रपती शिवाजी

महाराज व छत्रपती संभाजी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने राजापूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याप्रकरणी गंभीर दखल घेत पोलिसांनी या समाज कंटकाने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट

व्हायरल करून सामाजिक तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 196, 299 व 353 (2) अन्वये गुन्हा दाखल केला होता. यानंतर त्याच्या मोबाईल लोकेशन वरून तो पोलिसांना मुंबईत असल्याचे समजले.

त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबई पोलिसांच्या सहकार्याने शुक्रवारी रात्रीच या आरोपीला जेरबंद केले. त्यानंतर त्याला रत्नागिरीत आणण्यात आले.

याप्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधिक्षकानी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविला असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक नितीन ढेरे हे या प्रकरणी सखोल तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *