गुहागर :वेलदूर नवानगर जि. प.शाळेतील सांस्कृतिक सभागृहाचे विक्रांत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

banner 468x60

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवा नगर मराठी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री विक्रांत जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

banner 728x90

यावेळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण माजी सभापती स्मिताताई धामणस्कर, शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे ,केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम,

सामाजिक कार्यकर्ते विनायक मुळे, वेलदूर सरपंच दिव्या ताई वनकर, धोपावे चे सरपंच आशीर्वाद पावसकर, वेलदूरचे उपसरपंच राजू जावळे, धोपावे चे उपसरपंच श्री संदीप पवार, नवानगर रोहिलकरवाडी चे प्रमुख नारायण रोहिलकर, विठ्ठलवाडी चे अध्यक्ष व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर ,

वनकर वाडी चे अध्यक्ष संदीप वनकर, माजी सरपंच नंदकुमार रोहीलकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर ,उपाध्यक्ष संजना फुणगुसकर, नवानगर मराठीचे मुख्याध्यापक मनोज पाटील ,ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर ,इकबाल पंची, सौ जाधव

तरी बंदर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य निशाताई जाधव, महिला मंडळाचे अध्यक्ष विशाखा ताई रोहीलकर, रश्मी पटेकर, सौ वनकर ,पोलीस पाटील अमोल वायंगणकर, रमेश रोहीलकर, उमेश रोहीलकर, सुदर्शन जांभरकर ,दिलीप पलशेतकर ,मनोज पावसकर ,गोपाळ रोहीलकर ,घरटवाढीचे मुख्याध्यापक रमेश शिंदे अंजनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक गोरीवले सर ,अंजली मुद्दमवार ,सुषमा गायकवाड ,धन्वंतरी मोरे ,अफसाना मुल्ला व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी महिला मंडळाच्या पदाधिकारी शिक्षक वृंद उपस्थित होते.

विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नातून सांस्कृतिक सभागृहाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन विक्रांत जाधव व स्मिताताई धामणस्कर व प्रमुख पाहुणे यांचे हस्ते करण्यात आले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले. सुसज्ज सांस्कृतिक हॉल उभारण्यात आल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी महिला व बालकल्याण सभापती स्मिताताई धामणस्कर मॅडम म्हणाल्या की शाळेने गुणवत्ता क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने झेप घेतली.असून शाळेला विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत .

याचा मला अभिमान वाटतो स्मिताताई धामणस्कर मॅडम यांच्या कारकीर्दीत नवीन इमारत बांधण्यात आली. यावेळी बोलताना माजी अध्यक्ष विक्रांत जाधव म्हणाले की शाळेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी आपण सांस्कृतिक सभागृह बांधण्याचे अभिवचन दिले होते ते आज पूर्ण होताना मला मनस्वी खूप आनंद होत आहे.

याचा वापर शाळेतर्फे विविध उपक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी होणार आहे. त्यांनी शाळेविषयी गौरव उद्गार काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धन्वंतरी मोरे व अफसाना मुल्ला यांनी केले तर आभार प्रदर्शन अंजली मुद्दमवार यांनी केले

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *