रत्नागिरीसाठी वीज कोसळण्याचा इशारा, लांजा, संगमनेश्वर, गणपतीपुळे भागात जास्त धोक्याचा इशारा

banner 468x60

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत आज (दि.२१) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

याचबरोबर राज्यातील पुढील २ दिवस बहुतांश कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान रत्नागिरी (Ratnagiri News ) जिह्यातील अनेक महत्त्वाच्या भागात वीज कोसळण्याचा धोक्याचा इशारा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आज (दि.२१) एक्स अकाऊंटवरून दिला आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन पोस्टमध्ये म्हटले आहे की, रत्नागिरीसाठी वीज कोसळण्याचा इशारा असून, गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी भागात वीज कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

दरम्यान आज रत्नागिरीमधील लांजा, संगमनेश्वर, गणपतीपुळे भागात जास्त धोक्याचा इशारा असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे दामिनी ॲपद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *