चिपळूण : ‘इसिस’ला निधी पुरविल्याच्या आरोपातील सर्वांना 14 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

banner 468x60

‘इसिस’ संघटनेला निधी पुरविल्याच्या आरोपाखाली दहशतवादविरोधी पथकाने सावर्डे येथून एक स्थानिकासह कर्नाटकमधील पाच अशा सहाजणांना अटक केली होती.

banner 728x90

या सर्वांना १४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून,
या घटनेचा प्राथमिक तपास सावर्डे पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.

त्यामुळे पोलिस तपासात आणखी काय उघड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नवी मुंबई येथील दहशतवादविरोधी पोलिस पथकाने सावर्डेमधून सहाजणांना ताब्यात घेतले होते.

यामध्ये वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन (रा. इस्लामपुरा, भिवंडी), असीफ रशीद शेख (रा. नगरसूल, जि. नाशिक), फारूख शेरखान पठाण (रा. येवला-नाशिक), शाहनवाज प्यारेलाल (रा. बल्लापूर कर्नाटक़), इरशाद युसुफ शेख (रा. संगमनेर, अहमदनगर) आणि मुआज रियाज पाटणकर (रा. अडरेकर मोहल्ला-सावर्डे) या स्थानिक तरूणाचा देखील समावेश होता. ही माहिती सर्वत्र समजताच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

इसिस या दहशतवादी संघटनेला दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैसा पुरवत असल्याचा आरोप एटीएसच्या पथकाने या सहाजणांवर ठेवला आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास सुरू आहे.

कर्नाटक व अन्य विभागातून खैराची बेकायदेशीर तोड आणि वाहतूक करून सावर्डेमध्ये एका शेडमध्ये लपवून त्याचा साठा करण्यात आला होता. नवी मुंबई एटीएस पथकाने या ठिकाणी धाड टाकून सुमारे चाळीस टन खैर जप्त केला आहे.

हा खैर साठा नेमका कोणाला पुरविण्यात येणार होता? त्यातून येणारे पैसे कुठे जाणार होते? याचा तपास पोलिस करीत असून या सहाहीजणांना गुरूवारी चिपळूण येथे न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने या सहा आरोपींना दि. १४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सावर्डे येथील मुआज पाटणकर नामक तरूणाचा समावेश असल्याने पोलिस कसून चौकशी करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *