चिपळूण : डॉ. अमोल पवार यांनी दाखवलेल्या समयसूचकतेने बाळाचे प्राण वाचले बालकासाठी डॉक्टर ठरले ‘देवदूत’

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ हरेकरवाडी येथे बुधवारी, 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आली. बोलेरो पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील अडीच वर्षांचे बाळ गाडीबाहेर फेकले गेले.

यावेळी चिपळूणमधील ऑन्को-लाईफकेअर कॅन्सर सेंटरचे डॉ. अमोल पवार यांनी दाखवलेल्या समयसूचकतेने बाळाचे प्राण वाचले. त्यांनी बाळाला कृत्रिम सीपीआर दिला आणि तत्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉ. अमोल पवार हे चिपळूणच्या ऑन्को-लाईफ केअर कॅन्सर सेंटरमध्ये जात होते.

याचवेळी त्यांनी अपघातात गाडीतून फेकले गेलेले बाळ पाहिले. त्यांनी प्रसंगावधान राखत सीपीआर देण्यास सुरुवात केली. बाळाच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते. मात्र, सीपीआरला बाळाने प्रतिसाद दिला आणि त्याने हालचाल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने आपल्या गाडीतून बाळ व त्याच्या कुटुंबियांना 15 किमी अंतरावरील संगमेश्वर येथील रुग्णालयात नेले.

या प्रवासादरम्यानही बाळाला सीपीआर देण्यात आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच बाळ स्थिरावले आणि श्वासोच्छवास पूर्ववत झाला. चिपळूणच्या ऑन्को-लाईफकेअर कॅन्सर सेंटरचे डॉ. अमोल पवार सांगतात की, कार्डियो पल्मनरी रेसॅसिटेशन असा सीपीआरचा लाँगफॉर्म आहे. सीपीआर देण्याची एक विशिष्ट पद्धत असते.

जिचा वापर करून अनेकांचा जीव वाचवता येऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छवास किंवा हृदयाचे ठोके बंद झाले असतील, तर पुरेशा ऑक्सिजनअभावी तिच्या शरीरातील पेशी मृत होऊ लागतात.

या गोष्टीचा व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे काहीवेळा व्यक्तीचा मृत्यूदेखील होतो. अशा परिस्थितीत सीपीआर दिल्यास जीव वाचू शकतो.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *