शहरातील बाजारपेठेतील एका बेकरीमधून मुदत संपलेल्या शीतपेयांची विक्री होत असल्याचे ग्राहकाच्या निदर्शनास येताच त्याने जाब विचारला.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
त्यामुळे भर बाजारपेठेत ग्राहक व बेकरी मालक यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. बेकरीमधील अन्य शीतपेयदेखील मुदतबाह्य असल्याचे समोर आले आणि ग्राहकाने थेट तक्रार दाखल केली.
तर आपल्या पत्नीला अपशब्द वापरले, अशी तक्रार बेकरीमालकाने ग्राहकाविरोधात पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत घटनास्थळावरून तसेच संबंधित ग्राहकाकडून मिळाल्या माहितीनुसार, चिपळूण बाजारपेठेतील एका बेकरीतून स्थानिक ग्राहक महेश महादेव कांबळी (पागनाका, चिपळूण) यांनी शितपेय खरेदी केले.
बॉटलवरील नाव वाचल्यानंतर हे नवीन उत्पादन असल्याचे ग्राहकाच्या निदर्शनास आले. त्यांनी विचारणादेखील केली; परंतु ही नवीन कंपनी असून, उत्तम असल्याचे बेकरी मालकाने सांगितले केले. त्यामुळे ग्राहकाने ते पिताच त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले. पोटात मळमळ आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने सर्वप्रथम बाटलीवरील तारीख बघितली तेव्हा त्याची मुदत संपलेली होती.
ग्राहकाने तत्काळ सर्व बाटल्यांची तपासणी केली असता सर्व शितपेय मुदत संपलेली असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्याने बेकरीमालकाला जाब विचारला; परंतु समाधानकारक उत्तर न देता बेकरीमालक त्याला उलटसुलट बोलू लागला. वादावादी आणि बाचाबाची सुरू झाली. त्या ठिकाणी मोठी गर्ददिखील जमा झाली होती.
अखेर ग्राहकाने थेट अन्न व औषध प्रशासन तसेच चिपळूण नगर पालिकेकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला. बेकरी मालकानेदेखील पोलिस ठाण्यात धाव घेऊन ग्राहकाने आपल्या पत्नीला अपशब्द वापरले, अशी तक्रार दिली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*