राजकारणात महिलांची संख्या अजुनही कमी आहे. पण, संसदेच्या विशेष अधिवेशनात ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यास लोकसभेबरोबरच विधानसभेचे मतदारसंघही महिलांसाठी राखीव होणार आहेत.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी कोणते विधानसभा मतदारसंघ राखीव होऊ शकतात. हे लवकरच स्पष्ट होईल. या आरक्षणामुळे राज्य आणि देशपातळीवर राजकारणातही महिलांचा टक्का वाढणार आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी मोदी सरकारने देशभरातील महिला वर्गाला एक मोठं गिफ्ट दिलेले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाली.
त्यामुळे लोकसभा मतदारसंघाच्या ३३ टक्के जागा या महिलांसाठी राखीव होतील. तसेच विधानसभेतही असेच गणित पाहायला मिळणार आहे. जिल्ह्याचा विचार करता येथेही हे सूत्र लागू होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पूर्वी दापोली-मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा – राजापूर असे विधानसभेचे ७ मतदारसंघ होते.
मात्र, विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पाच मतदारसंघ राहिले. खेड आणि संगमेश्वर असे दोन मतदारसंघ कमी झाले. खेड-दापोली-मंडणगड असा एक मतदारसंघ झाला. संगमेश्वरचा काही भाग चिपळूणला आणि काही भाग रत्नागिरीला जोडण्यात आला.
आता ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यास जिल्ह्यातील कोणते मतदारसंघ महिलांसाठी राखीव होऊ शकतात. ते कोणते असणार याबाबत निश्चित स्पष्टता नसली तरी जिल्ह्याच्या राजकारणातही महिलांचा टक्का वाढणार हे निश्चित आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













