मुंबई गोवा महामार्ग अवजड वाहतुकीसाठी एक महिना बंद

banner 468x60

मुंबई गोवा महामार्गासंबधी एक मोठी बातमी आहे. गणेशोत्सवासाठी महामार्गावर अवजड वाहतूकीवर बंदी आणण्याचे सरकारने ठरवले आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

रविवार दिनांक २७ ऑगस्ट २०२३ पासून २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत ही बंदी असणार आहे. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सुखकर प्रवास करता यावा म्हणजेच रस्त्यावरील खड्यांच्या समस्येपासून मुक्तता व्हावी यासाठी सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, त्यामुळं जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या अवजड वाहन चालकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा, असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. गणेशोत्सवा तीन आठवड्यावर येऊन ठेपला असून मुंबई गोवा महामार्गाच्या विविध टप्प्यावर अहोरात्र काम सुरु असताना अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रचंड ताण विशेषतः रायगड जिल्ह्यातील रस्ते कामावर येतोय म्हणून आज २७ ऑगस्ट २०२३ पासून २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत या महामार्गावर अवजड वाहतूकीवर बंदी आणण्याचे सरकारने ठरवले आहे

असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी जाहीर केले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक लेन ही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

शनिवारी २६ ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांनी रायगड जिल्ह्यात पळसपे येथे इंदापूर या मार्गाची पाहणी केली. या मार्गाचे काम जलद गतीने व्हावे तसेच वाहतूक कोंडी टाळावी यासाठी या पाहाणीनंतर त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *