रत्नागिरी : आंबा घाटात ट्रक दरीत कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील Amba Ghat येथे शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. साखरेने भरलेला ट्रक खोल दरीत कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Mohammad Ramsher Tahir Hussain Ansari (वय ३६, रा. झारखंड) हे एमएच १० डीटी ४४०९ क्रमांकाचा ट्रक घेऊन फलटण येथून साखरेची पोती भरून जयगडच्या दिशेने जात होते. सकाळी सुमारे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घाटातील रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ट्रकचा ताबा सुटला आणि वाहन थेट रस्त्यालगतच्या दरीत कोसळले.


या अपघातात चालक अन्सारी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी Suresh Kadam व पोलीस निरीक्षक Uday Zhavare यांच्यासह साखरपा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली असून अधिक तपास सुरू आहे.


दरम्यान, घाटातील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *