रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील काही ठिकाणचे आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
बाजार व जत्रा अधिनियम, १८६२ चे कलम ५ (ग)(क) मधील तरतुदीनुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी, संगमेश्वर तालुक्यातील माखजन,
रत्नागिरी तालुक्यातील निवळी तसेच रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार बंद राहणार आहेत.
मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













