चिपळुणातील मुख्यमंत्र्यांची सभा रद्द, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर सभा रद्द

banner 468x60

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज चिपळूण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा मोठ्या उत्साहात पार पडणार होती. मात्र अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.


banner 728x90


आजच्या सभेसाठी परिसरात जोरदार तयारी करण्यात आली होती. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु अपघाताची गंभीर घटना समोर आल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सभेचे आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.


दरम्यान, अपघातात विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून राज्यभरात शोकमय वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील सर्व कार्यक्रम तात्पुरते स्थगित ठेवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *