चिपळूण तालुक्यातील टेरव ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंचांवर तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखला केला आहे. उपसरपंच सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यांच्या कारभारावर आम्हाला विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे ९ पैकी ७ सदस्यांनी अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केल्या आहेत.टेरवमध्ये किशोर कदम हे थेट सरपंच म्हणून विजयी झाले होते.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून गावातील राजकीय गणिते बदलली आहेत. सरपंच कदम हे रयत संघटनेचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने सरपंचपदी विराजमान झाले होते. सरपंच कदम यांना संघटेतून बाजूला करत नव्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्षपदी संधी देण्यात आली. सध्या सरपंच कदम यांची प्रकृती ठीक नसल्याने ते वैद्यकीय कारणासाठी रजेवर गेले आहेत. सध्या उपसरपंच म्हणून रिया राकेश म्हालीम कार्यरत आहेत.सरपंचांच्या रजेच्या कालावधीत प्रभारी सरपंच म्हणून म्हालीम यांच्याकडे कारभार आहे. मात्र त्यांचा कारभार मान्य नसल्याचे सदस्यांनी स्पष्ट करीत त्यांच्यार अविश्वास ठराव दाखल केला आहे. अविश्वास ठरावावर अनंत चांदिवडे, संतोष मोहिते, महेंद्र खांबे, मानसी कदम, रिया कदम, वनिता पालकर, सुप्रिया वास्कर यांनी स्वाक्षरी केली आहे. या ठरावाच्या पडताळणीसाठी त्वरित बैठक लावण्याची मागणी या सदस्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*