चिपळूण : शिवसेनेचे विनोद झगडे पती-पत्नी एकाच वेळी निवडणूक रिंगणात

banner 468x60

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलोरे परिसरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेना–भाजप युतीकडून पती-पत्नी एकाच वेळी निवडणूक रिंगणात उतरल्याने या लढतीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. अलोरे जिल्हा परिषद गट क्रमांक १९ मधून शिवसेना–भाजप युतीच्या सौ. विनया विनोद झगडे, तर अलोरे पंचायत समिती गण क्रमांक ३७ मधून विनोद प्रकाश झगडे यांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले आहेत.

banner 728x90

नवरा आणि बायको एकाच वेळी निवडणूक रिंगणात असल्याने अलोरे गटात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक पातळीवर या उमेदवारीकडे उत्सुकतेने पाहिले जात असून, निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

उमेदवारी अर्ज सादर करताना शिवसेना–भाजप युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सौ. सीमाताई सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, प्रणव झगडे, विशाल ओसवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

पती-पत्नी दोघेही निवडणूक रिंगणात उतरल्याने अलोरे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील लढत अधिक लक्षवेधी ठरणार असून, मतदार कोणावर विश्वास दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *