चिपळूण : शिरगाव गणातून युतीतर्फे भाजपकडून ऍड. नयना पवार उमेदवारी जाहीर, युतीने दाखवलेला विश्वास विजयाच्या रूपाने सार्थकी ठरवू- ऍड. नयना पवार*

banner 468x60

विधी व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ऍड. नयना उदय पवार यांना भाजपातर्फे शिरगाव पंचायत समिती गणासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेना-भाजप युतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

banner 728x90

चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना- भाजप युती झाली आहे. भाजपाने सोमवारी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये विधी व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या ऍडवोकेट

. नयना उदय पवार यांना शिरगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी जाहीर झाली आहे. नयना पवार या चिपळूण तालुका वकील संघ -उपाध्यक्ष, महाराष्ट्र नोटरी असोसिएशन- तालुका अध्यक्ष, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका आणि अधिवक्ता परिषद रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीत लिटीगेशन सहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळीत आहेत.

विधी व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून पवार यांचा जनसंपर्क व संघटन कौशल्य प्रबळ राहिले आहे. जनतेच्या अडीअडचणीची जाणीव आहे .

याचीच दखल घेऊन भाजपाने ऍड. नयना पवार यांना शिरगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीबद्दल नयना पवार यांनी आनंद व्यक्त केला असून शिवसेना-भाजप युतीने दाखवलेला विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री

. एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री. उदय सामंत, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली विजयाच्या रूपाने सार्थकी ठरवू आणि भविष्यात जनतेच्या हिताला प्राधान्य देऊ, अशी ग्वाही नयना पवार यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *