रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या राम आळी परिसरात आज रविवारी सकाळी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली. एका एटीएमच्या सुरक्षा रक्षकाने रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीवर दगडाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. भरवस्तीत रक्ताचा सडा पडल्याचे दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८:३० ते ९:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगेश यशवंतराव भारती (रा. तोणदे) हे राम आळी येथील जनता बँकेच्या एटीएमसमोर रस्त्यावर झोपले होते. संबंधित एटीएमवर सिक्युरिटी कंपनीमार्फत नियुक्त करण्यात आलेला सुरक्षा रक्षक स्वप्निल पाटील याने मंगेश भारती यांना तेथून उठून बाजूला जाण्यास सांगितले.
मात्र मंगेश भारती हे तिथून त्वरित हलत नसल्याने संतप्त झालेल्या सुरक्षा रक्षक स्वप्निल पाटील याने रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात मोठा दगड मारल्याचे समोर आले आहे. हा हल्ला इतका गंभीर होता की घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते.
राम आळी हा रत्नागिरी शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि संवेदनशील भाग असून पहाटेपासून येथे व्यापारी व नागरिकांची सतत ये-जा असते. मात्र रविवारी सकाळ असल्याने त्या वेळी परिसर तुलनेने शांत होता. तरीही भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार वायचळ, पोलीस उपनिरीक्षक सागर वाळुंजकर, भगवान पाटील तसेच पोलीस हवालदार वैभव नार्वेकर व राकेश बागुल हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
या प्रकरणी संशयित सुरक्षा रक्षक स्वप्निल पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमी मंगेश भारती यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
दरम्यान, भरवस्तीत अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एटीएम आणि सार्वजनिक ठिकाणी नियुक्त सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षण व वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.
राम आळी हा रत्नागिरी शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि संवेदनशील भाग असून पहाटेपासून येथे व्यापारी व नागरिकांची सतत ये-जा असते. मात्र रविवारी सकाळ असल्याने त्या वेळी परिसर तुलनेने शांत होता. तरीही भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार वायचळ, पोलीस उपनिरीक्षक सागर वाळुंजकर, भगवान पाटील तसेच पोलीस हवालदार वैभव नार्वेकर व राकेश बागुल हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी संशयित सुरक्षा रक्षक स्वप्निल पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमी मंगेश भारती यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
दरम्यान, भरवस्तीत अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एटीएम आणि सार्वजनिक ठिकाणी नियुक्त सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षण व वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*