रत्नागिरी : गणपतीपुळ्यात पर्यटक तरुणाचा बुडून मृत्यू

banner 468x60

भिवंडी येथून गणपतीपुळे येथे देवर्शन व पर्यटनासाठी आलेल्यांपैकी तिघेजण सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बुडाले. मदतीसाठी आरडाओरड झाल्यानंतर यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून अमोल गोविंद ठाकरे (25) या युवकाचा मृत्यू झाला आहे.

banner 728x90 banner 728x90

विकास विजय पालशर्मा (२४) आणि मंदार दीपक पाटील (२४, दोघेही रा. भिवंडी) यांना समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखून वाचवले. ही घटना शनिवार 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. किनार्‍यावरील जीवरक्षक तसेच मंदिर प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही पर्यटक समुद्रस्नान करताना खबरदारी घेत असल्याचे उघड झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काही मित्र शनिवारी गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण मंदिरानजीकच्या समुद्रात उतरले असताना यातील तिघेजण बुडू लागले. यानंतर किनार्‍यावर आरडाओरड झाल्यावर जीवरक्षकांनी बुडणार्‍या तिघांपैकी दोघांना किनार्‍यावर सुरक्षित आणले.

मात्र, यातील अमोल गोविंद ठाकरे याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जयगड पोसिल घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड-गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *