रत्नागिरी : भक्ती मयेकरला कॉल करुन छळणाऱ्या सीताराम वीरबाबत पोलीस तपासात रिक्षावाल्याने काय सांगितलं?

banner 468x60

रत्नागिरी येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणानंतर तिहेरी हत्याकांड उघड झाले. या प्रकरणात दुर्वास पाटील आणि त्याचे तीन साथीदार कोठडीत आहेत. तिहेरी हत्याकांडाच्या साखळीतील पहिला खून झालेल्या सीताराम वीर यांच्याबाबत पोलिसांकडे मोठी माहिती हाती आली आहे.

banner 728x90 banner 728x90

कळझोंडी येथील सीताराम वीर यांना दुर्वास पाटील आणि त्याच्या दोघा साथीदारांनी खंडाळा येथील सायली बारमध्ये मारहाण केली होती. त्यानंतर दुर्वासने सीताराम वीर यांना ज्या रिक्षातून घरी पाठवलं होतं, त्या रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. या खुनामध्ये दुर्वास पाटीलसोबतच त्याचा बाप दर्शन पाटील याचाही हात असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

दुर्वास पाटील याची प्रेयसी भक्ती मयेकर हिला सीताराम वीर हा कॉल व मेसेज करून त्रास देतो, असा संशय दुर्वास याला आला होता. सीताराम याला धडा शिकवायचा असा पण दुर्वास याने केला होता. २९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम हा दुर्वास पाटील याच्या सायली बारमध्ये दारु पिण्यासाठी आला होता. यावेळी दुर्वास आणि त्याच्या दोघा सहकाऱ्यांनी सीतारामला बेदम मारहाण केली. मात्र सीताराम दारू पिऊन पडला आणि जखमी झाला अस भासवण्याचा प्रयत्न दुर्वास पाटीलने केला होता.

यामध्ये सीताराम यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने घाबरलेल्या दुर्वासने खंडाळा रिक्षा स्टॅन्डवरून एका रिक्षा चालकाला बोलावून वीर यांना घरी सोडून येण्यास सांगितले. सीताराम वीर हा बारमध्ये चक्कर आल्याने पडून जखमी झाला असे भासवलं. दुर्वासने सीतारामसोबत रिक्षाने एक माणूस पाठवून दिला. रिक्षा चालकाने सीताराम वीर यांना कळझोंडी येथील घरी सोडलं. ते घरी बेशुद्धावस्थेतच पोहोचले होते. त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी तातडीने घरच्यांनी जवळच्या डॉक्टरांना बोलावलं होत.

परंतु घरी आलेल्या डॉक्टरांनी सीताराम हा मृत असल्याचे सांगितले. सीताराम वीर यांचा आकस्मिक मृत्यू झाला, तरी याची कोणतीही माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. सीताराम वीर यांना दारुचं व्यसन होतं, त्यामुळे यातूनच त्यांचा मृत्यू झाला असा काहीसा समज घरच्यांचा झाला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना न देता अंत्यविधी उरकण्यात आला होता. दुर्वास पाटील आणि त्याचा बाप दर्शन पाटील यांच्या सांगण्यांनुसार ज्या रिक्षा चालकाने सीताराम वीर यांना घरी सोडलं, त्या रिक्षा चालकाला दुसऱ्या दिवशी घरी बोलावून घेतलं.

कालच्या भाड्याची विचारणा केली, त्या रिक्षा चालकाने कालचे भाडे 150 रुपये झाल्याचे सांगितले, त्याप्रमाणे हे भाडे रिक्षा चालकाला देण्यात आलं. या सगळ्या प्रकरणात रत्नागिरी पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *