Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

मंडणगड : कोकणात बांबू शेतीचे नवे पान – तरुण भावेश कारेकर यांचा पुढाकार

banner 468x60

कोकण आणि बांबू शेती हे समीकरणच वेगळे आहे. परंतु गेल्या काही वर्षांत कोकणातील नवीन पिढीने शेतीकडे पाठ फिरवली आहे, असे चित्र दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवर मंडणगड व दापोली तालुक्यातील तरुण भावेश कारेकर यांनी मित्रमंडळींच्या साहाय्याने तब्बल ५० एकरांवर बांबू शेती उभी करून वेगळाच आदर्श घालून दिला आहे.

banner 728x90 banner 728x90

आयटी क्षेत्रातील उच्च पदावरील नोकरी सोडून त्यांनी आपल्या तालुक्यात शेती, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धनावर काम करण्याचा ध्यास घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण
कारेकर स्वतः लागवड करत असतानाच तालुक्यातील शेतकऱ्यांना बांबू शेतीचे महत्त्व पटवून देतात. बांबू लागवड पद्धती, खड्डे खोदण्याचे अंतर, खत व्यवस्थापन, रोगप्रतिबंध, आणि नंतरचे बाजारपेठेतील संधी याबाबत ते शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन माहिती देतात.

यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये बांबू शेतीबाबत विश्वास व उत्सुकता निर्माण झाली आहे.
बांबू हा वेगाने वाढणारा, कमी पाणी लागणारा आणि मातीची धूप रोखणारा वनस्पती आहे. कार्बन शोषणाची क्षमता इतर झाडांच्या तुलनेत जास्त असल्याने हवामान बदलावर नियंत्रण मिळविण्यात बांबूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

कोकणातील टेकाडे व मोकळी पडलेली जमीन या बांबू लागवडीमुळे हरित पट्ट्यांमध्ये रूपांतरित होऊ शकते.
बांबूपासून काडीकाम, फर्निचर, बांधकाम साहित्य, पेपर, वस्त्रनिर्मितीपासून ते बायो-चार व बायो-एनेर्जीपर्यंत शंभरहून अधिक उत्पादने तयार होऊ शकतात. यामुळे ग्रामीण भागात लघुउद्योग उभारण्याची मोठी संधी निर्माण होते. भविष्यात प्रक्रिया केंद्रे व क्लस्टर उभारून स्थानिक युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कारेकर यांचे उद्दिष्ट आहे.


या उपक्रमाला मोलाची साथ देत आहेत विनय कोलते, ज्यांची भोर (पुणे) येथे बांबू नर्सरी आहे. दर्जेदार रोपे व तांत्रिक सहाय्यामुळे हा प्रकल्प अधिक शाश्वत व यशस्वी ठरत आहे.


आगामी काळात भावेश कारेकर यांचे ध्येय कमीतकमी १००० एकरांवर बांबू शेती विस्तारण्याचे आहे. यामुळे शेकडो स्थानिकांना थेट-अपरोक्ष रोजगार मिळेल, कोकणात हरित अर्थव्यवस्था निर्माण होईल आणि बांबू आधारित टिकाऊ उद्योगांना गती मिळेल.


भावेश कारेकर यांचा हा उपक्रम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून कोकणाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला, पर्यावरणाला आणि समाजजीवनाला नवी दिशा देणारा ठरला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *