कराड-चिपळूण मार्गावरील सती येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडकीस आली. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूजा कल्पेश पवार (25, सती) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याबाबतची खबर कल्पेश अनंत पवार (30, सती) यांनी दिली. पूजा पवार या कुटुंबासह सती येथे रहात होत्या. गुरुवारी त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कुटुंबाला समजताच त्यांना तत्काळ उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकऱ्यानी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
चिपळूण : नवविवाहितेची आत्महत्या सती येथील घटनेने खळबळ
Recommendation for You
चिपळूण – गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल,गोवळकोट…
चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण नजीक असुर्डे येथे मुंबईवरून गोव्याकडे जाणारी गाडी दरीत कोसळली असून…
नरवण (ता. गुहागर) येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर…
पूर्व वैमनस्यातून राग मनात धरुन खेडकडे जाणाऱ्या एका कारला मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट येथे अडवण्यात…